विडणी -(योगेश निकाळजे) - महामानव विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने विडणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विडणी (बौद्धनगर) येथील संघमित्र तरुण मंडळ यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज गुरूवार दि.13 रोजी रात्री 7 वाजता फुले - शाहू - आंबेडकर विचारांच्या काव्य गीतांवर आधारीत जागर समतेचा परिवर्तन काव्य जलसा कार्यक्रम होणार असून यामध्ये शाहीर प्रमोद जगताप, कवी. अॅड.आकाश आढाव, कवी दलित गायकवाड यांचा सहभाग असणार आहे, त्यानंतर 8 वाजता कु.प्राची सुनिल मोहिते यांचा मी रमाबाई आंबेडकर बोलतेय हा एकपात्री कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास फलटण पोलिस स्टेशनचे पीएसआय सौ.दिपाली गायकवाड यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत,रात्री 12 वाजता तक्षशिला बुद्धविहारात सामुदायिक बुध्दवंदना व भिमस्तूतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर माता भिमाई स्मारक सातारा येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.14 एप्रिल रोजी बुद्धविहारात सकाळी 8 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुध्दवंदना घेण्यात येणार आहे त्यानंतर 8.30 वाजता ग्रामपंचायतसमोर गावातील प्रमुख मान्यवर तसेच उपासक उपासिका व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे, सायंकाळी 7 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.