साखरवाडी गणेश पवार
मौजे गुणवरे येथे जुगार करीता पैसे स्वीकारताना दोन जणांना ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यावेळी 922 रुपये किमतीच्या जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 रोजी मौजे गुणवरे तालुका फलटण गावच्या हद्दीत सोसायटीचे इमारतीचे पाठीमागे आडोशाला संशयित अजित अशोक जाधव (वय 27वर्षे रा. गुणवरे ता.फलटण) व जय शंकर पवार (राहणार मलटण फलटण तालुका फलटण) यांनी आर्थिक फायद्याकरता लोकांचे कडून पैजेवर पैसे स्वीकारून कल्याण नावाचा मटका जुगार घेत असताना 922 रुपये किमतीच्या जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आढळून आले. याप्रकरणी पो. हेड कॉन्स्टेबल बबन रघुनाथ साबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस हवलदार साबळे करत आहेत.