साखरवाडी गणेश पवार
कुंभार भट्टी मलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून दोन लाख 45 हजार रुपयांचा गांजा जप्त केला असून दोघांना अटक केली आहे संशयित युवराज बाळू मोरे (वय 38) व रामा राजेश जाधव (वय 30) दोघेही रा कुंभार भट्टी मलटण ता फलटण यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार
दि . 25 रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुंभारभट्टी मलटण येथे संशयितांच्या राहते घराचे आतील रूममध्ये एका पोत्यात 12 किलो 170 कि . ग्रॅम तसेच 60 ग्रॅम वजनाचा 9 पुढ्या हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा सदृश्य पदार्थ पोउपनि शिंदे, व पोलीस पथकाने छापा टाकून जप्त केले.त्याची किंमत 2 लाख 44 हजार 600 रू असून गुन्ह्याची फिर्याद पो ना सचिन जगताप व पुढील तपास पो उप नि कदम करीत आहेत.