Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोरक्षकांनी लोणंद येथे इनोव्हा कारमधून होणारी गौमांस तस्करी पकडली दोघांवर गुन्हा दाखल 3 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त crime

 




साखरवाडी गणेश पवार

 

गोरक्षकांनी लोणंद येथे इनोव्हा गाडीमधून होत असलेली गौमांस तस्करी पकडून 3 लाख 50 हजाराचा मुद्देमाला सकट दोघांना पकडून लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिले.लोणंद पोलीस स्थानकात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला  असून संशयित जावेद  मोहिनुद्दीन शेख  (वय25) व अब्दुल रहमान रौफ (वय 48)दोघेही रा जुही गल्ली अंधेरी पश्चिम मुंबई अशी त्यांची नावे आहेत.





याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार व फिर्यादी गोरक्षक शरद धनंजय गाडे (वय 22) वर्षे  रा विडणी ता फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  दि . 24 रात्रौ 08.15 वा चे सुमारास विडणी ता फलटण येथुन माझ्या मोटार सायकलवरून  लोणंद ता खंडाळा येथील गोशाळा गोळेगाव येथे झोपणेसाठी चाललो होतो . त्यावेळी मौजे फलटण गावचे हद्दीत तांबमळा येथे मला माझे पाठीमागुन आलेली इनोव्हा कार क्र MH 43AB 1461 ही माझे मोटर सायकल ला ओव्हर टेक करुन लोणंद दिशेला निघुन गेली . त्यावेळी सदर इनोव्हा कार मधुन लाल रंगाचे पाणी पडत होते म्हणुन मी सदरचे इनोव्हा कारचे पाठीमागे फलटण ते लोणंद असा पाठलाग करीत येत होतो यावेळी मी  माझा मावस भाऊ अक्षय संजय क्षीरसागर रा लोणंद ता खंडाळा याला फोन केला व फलटण ते लोणंद जाणाऱ्या इनोव्हा कारला  थांबिणेस सांगितले , त्यानुसार फलटण रेल्वे पुलाजवळ आलेवर अक्षय क्षीरसागर व त्याचे दोन मित्र यानी सदरची गाडी रात्रौ 09.30 वा चे सुमारास थांबवून सदर कारची पाहणी केली असता काळ्या रंगाच्या प्लॅस्टीकच्या कागदामध्ये गाई व बैलाचे मांसाचे तुकडे केलेले व झाकलेले अवस्थेत दिसले यावरुन सदर इसम हे गौमांस बेकायदेशीर विक्री करीता घेवुन जात असल्याची खात्री झाल्याने आम्ही लागलीच सदर वाहन लोणंद पोलीस ठाणे येथे घेवून आलो . लोणंद पोलीस ठाणे येथे पोउपनि माने  व पोना कदम यांनी  इनोव्हा कार मध्ये गोमांस असल्याची खात्री झाली त्यामध्ये  50 हजार रुपये किंमतीच्या काळे रंगाचे ताडपत्री मध्ये गुंडाळलेले गाय व बैलाच्या मांसाचे सुमारे 500 किलो वजनाचे लहान मोठे तुकडे  आढळून आले त्यानुसार  लोणंद पोलीस ठाण्यात  दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तीन लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी व 50 हजार रुपये किंमतीचे  500 किलो गोमांस असे एकूण साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अमोल पवार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.