साखरवाडी(गणेश पवार)
भिलकटी ता फलटण गावच्या हद्दीमध्ये भिलकटी- वडजल रस्त्यावर दिनांक 25 रोजी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास दोन 7 ते 8 वर्षे वयाच्या देशी गाईं कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो फलटण ग्रामीण पोलीसांनी पकडून 1 लाख रुपयांच्या दोन देशी गाई व 5 लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो जप्त करून चालक युवराज शंकर खलाटे (वय 41) रा शिंदेवाडी ता फलटण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि 25 रोजी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास वडजल- भिलकटी रस्त्यावर पिकअप क्रमांक एम एच 11 बी एल 83 17 यामध्ये चालक युवराज खलाटे हा दोन 7 ते 8 वर्षे वयाच्या देशी गाई दाटीवाटीने कोणत्याही चारापाण्याची सोय न करता कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे फलटण ग्रामीण पोलीसांच्या निदर्शनास आल्याने पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून फिर्याद पो कॉ महेश जगदाळे यांनी दिली असून पुढील तपास सह पो फौ हंगे करीत आहेत