साखरवाडी(गणेश पवार)
फुलेनगर (साखरवाडी) तालुका फलटण येथे हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी आयोजित केले असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री हनुमान तरुण मंडळ फुलेनगर यांच्यावतीने देण्यात आली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा-
ग्राम प्रदक्षिणा सकाळी 8.30
पुण्याहवाचन 8.30 ते 9
देवताअवाहन व स्थापना स . 9.30 ते 10.30
जलवास व ध्यान्यवास स . 10.30 ते 11
होमहवन दु .11 ते 12
मूर्ती प्राणप्रतिष्ठा 12.01
पूर्णाहुती व आरती दु .12.45ते 1.00
महाप्रसाद दु .1.30 ते3.30
4 ते 6. या वेळेत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ साखरवाडी परिसर व 7 ते 9 माऊली प्रासादिक भजनी मंडळ पिंपळवाडी यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान तरुण मंडळ साखरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.