![]() |
संग्रहित चित्र |
साखरवाडी (गणेश पवार)
सोनगाव (ता फलटण) येथील सोलर प्लांट वरील 60 हजार रुपये किमतीचा जनरेटर चोरून नेल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान सोनगाव येथील सोलर प्लांट येथून संशयित योगेश दरवडे रा सांगवी ता बारामती व किरण पवार रा फलटण यांनी चोरून नेल्याची फिर्याद दीपक शिवाजी चव्हाण रा सांगवी ता बारामती यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत