विडणी(योगेश निकाळजे) - विडणी पंचवार्षिक निवडणूकीत विडणी विकास आघाडीच्या प्रचारार्थ आज खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांची सभा आयोजीत करण्यात आली असून या सभेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून या निवडणूकीत भाजप व मित्रपक्ष प्रणित विडणी विकास आघाडी व राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये थेट लढत होत आहे, सत्ताधारी गटाचा मनमानी व भ्रष्टाचारी कारभार तसेच सभासदांच्या हिताचा निर्णय न घेत सोसायटीचा वापर फक्त राजकारणाकरीता केला जात असल्याने या प्रस्थापितांची सत्ता उलथून टाकण्यासाठी विडणी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात असून याला सभासदांचाही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ही निवडणूक माढा लोकसभेचे खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेची बनली असून आज शुक्रवार दि.17 रोजी सायंकाळी 7 वाजता उतरेश्वर मंदिरासमोर खा.रणजीत नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार यांची जाहीर सभा होणार असून या सभेस माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्यासह भाजपचे फलटण शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.


