साखरवाडी(गणेश पवार)
मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या नावाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, त्यांचा जन्म आमच्या मातीत, तालुक्यात, जिल्ह्यात झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुरूम ता फलटण येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 330 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.
जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण, ग्रामपंचायत मुरूम, श्रीमंत मल्हारराव होळकर जयंती उत्सव समिती, अखिल भारतीय धनगर समाज विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे होते. मल्हारराव होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, पंचायत समितीच्या गट विस्तार अधिकारी अमिता गावडे, गटशिक्षणाधिकारी पठाण मॅडम, माणिकराव सोनवलकर, रेखाताई खरात, महानंदाचे संचालक डी के पवार, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सागर कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
संजीवराजे पुढे म्हणाले, श्रीमंत मल्हाराव होळकर यांचे जन्मगाव असलेल्या मुरूम या ठिकाणी भविष्यात मल्हार सृष्टी उभारण्यासाठी सर्वांनी सर्व राजकीय मतभेद विसरून एकत्रित येण्याची आवश्यकता असून या ठिकाणी होणाऱ्या स्मारकासाठी आपण अर्धाकृती पुतळा देणार असल्याची घोषणा करून भविष्यात या ठिकाणी लवकरात लवकर भव्य स्मारकासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर, गोविंदराव देवकाते,रामराव वडकुते, विश्वासराव देवकाते, गणेश हाके यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाला मुरूम गावच्या सरपंच प्रियांका संकपाळ,
ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष बोंद्रे, बाळकृष्ण बोंद्रे ,अभयसिंहराजे निंबाळकर, नितीन शाहू राजे भोसले, बजरंग गावडे, काशिनाथ शेवटेहनुमंत शेळके, सागर शेळके, राजाभाऊ बरकडे, महादेव संकपाळ ,पराग बोंद्रे, अनिल संकपाळ, तानाजी पाटील, योगेश माडकर ,संतोष शेंडगे,मुरूम ग्रामस्थ व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांनी केले तर आभार कृष्णात चोरमले यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास सावंत यांनी केले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

