साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथे 1 वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला होता व सदर मुलीची सातारा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली असून पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, साखरवाडीतील तरुणाचा 4 एप्रिल 2022 रोजी अल्पवयीन मुलीशी प्रेम प्रकरणातून विवाह करण्यात आला होता त्यातून सदर मुलगी गर्भवती राहून असून तिची 14 मार्च 23 रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात प्रस्तुती झाली डॉक्टरांनी तिच्याकडे वयाचा दाखला मागितला असता मुलीचे वय प्रसूतीवेळी 18 वर्षाचे असल्याचे व विवाह वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे धक्कादायक बाब निदर्शनास आली असून पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत
%20(14).jpeg)