साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी ( तालुका फलटण ) येथील श्री भवानीमातादेवी मंदिरात श्री रामनवमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळपासूनच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी समर्थ मंडळाने भजन सादर केले.बरोबर 12 वाजता प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव साजरा केला.
परिसरातील अनेक महिला भगिनींनी पाळणा म्हटला आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.प्रसाद वाटपासाठी हरिदास सावंत सर, वंदना भोसले, मुकुंद जोशी, संजय बोडरे, मनोज बोन्द्रे, दत्तात्रय पवार, अनंत भोसले, अरविंद किंकर, कुऱ्हाडे कॉन्ट्रॅक्टर, दत्तात्रय बोडरे, रमेश कुचेकर, प्रशांत रणवरे इत्यादींनी सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही शारदोत्सव मंडळाचे कार्यवाह हरिदास सावंत सर यांनी केली त्यांना अरविंद किंकर, राजेंद्र देशपांडे, रसिक भिसे, सुरज गाडे , महादेव चव्हाण इत्यादींनी उत्तम मदत केली .परिसरातील अनेक स्त्री पुरुष भाविक या सोहळ्याला उपस्थित होते !