साखरवाडी गणेश पवार
आळजापूर (ता फलटण) ग्रामपंचायतच्या सरपंच पदी युवा सदस्य व उद्योजक शुभम बाळासाहेब नलवडे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून अतिशय कमी वयात राजकारण व यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी घेतलेली उतुंग झेप वाखाणण्याजोगी आहे.
मला राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असून ज्येष्ठ नेते व चुलते फलटण तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, संतकृपा उद्योग समूहाचे चेअरमन विलासराव नलवडे, संतकृपा उद्योग समूहाचे व्यवस्थापक वडील बाळासाहेब नलवडे,शंकरराव नलवडे, रंजनभाऊ काकडे, तुकाराम नलवडे, अशोक पवार, जीवन केंजळे, चंद्रकांत पवार, जालिंदर नलवडे,राजेंद्र नलवडे सर, मारुती रणदिवे, संतकृपा उद्योग समूहाचे एम डी निलेश नलवडे यांचे कायम अनमोल मार्गदर्शन व साथ मिळत असून भविष्यात गावच्या विकास कामांसाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे सरपंच पदी निवड झाल्यानंतर शुभम नलवडे यांनी सांगितले.
शुभम नलवडे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, संतकृपा उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी व आळ जापूर ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.