साखरवाडी गणेश पवार
फलटण ग्रामीण पोलिसांनी साखरवाडी येथून अंधारात लपून बसलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खुंटे व कांबळेश्वर येथील इलेक्ट्रिक मोटारी चोरी केली असल्याचे कबूल केलेबसल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळाली असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक 28/03/2023 रात्रौ 11.00 वाजता फलटण ग्रामीण पोलिसांनी रात्रगस्त घालताना साखरवाडी येथील चांदणी चौकामधील बोळात अंधारात लपून बसलेल्या संशयित पृथ्वीराज रवींद्र जाधव वय 20 वर्ष राहणार चौधरवाडी तालुका फलटण व गणेश संदीप खलाटे वय 19वर्ष राहणार खुंटे तालुका फलटण दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता खुंटे तालुका फलटण व कांबळेश्वर तालुका फलटण या गावातून इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याचे कबूल केले आहे