साखरवाडी (गणेश पवार)
सांगवी ता फलटण येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली असून फिर्याद साजन दादा शेख वय 23 यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादीची बहीण जरीना आमिर शेख वय 32 वर्षे रा कुंभारटेक ता फलटण जि सातारा या 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सांगवी इथून मशेरी आणायला जाते म्हणून निघून गेल्या असून त्या अद्याप पर्यंत परत न आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस हवालदार अडसुळ करीत आहेत