साखरवाडी (गणेश पवार)
मुरूम तालुका फलटण येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला मुरूम स्वागत कमान ते लक्ष्मी माता मंदिर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते पराग बोंद्रे यांनी संबंधित विभागाकडे करून सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती दि 16 रोजी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 330 व्या जयंतीनिमित्त माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुभेदार मल्हारराव होळकर यांना अभिवादन करण्यासाठी मुरूम तालुका फलटण या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्म गावी आले असता सदर रस्त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते पराग बोंद्रे यांनी खासदारांकडे मागणी केली असता तात्काळ या रस्त्यासाठी 10 लाख रुपये देण्याची घोषणा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली यावेळी मुरूम ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानण्यात आले.
