Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

क्षमता वाढवून डी. पी स्थलांतरित करण्याची शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे मागणी magani

 


साखरवाडी(गणेश पवार)

 फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर व वाखरी हद्दीतील महावितरणचा चिंतामणी-२ डी.पी. ६३ एच.पी. ऐवजी १०० एच.पी. करून लोकवस्तीत स्थलांतरित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने फलटणच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, महावितरणचा वाठार व वाखरी हद्दीतील चिंतामणी-२ डी.पी. बसविल्यानंतर दोन-तीन दिवसात जळतो. असे चारवेळा झालेले आहे आणि तोच डी.पी. चार ते पाचवेळा चोरीलाही गेला आहे. त्यामुळे गेली सहा महिने या परिसरातील शेतकर्‍यांच्या विद्युतपंपांना वीज नसल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात येऊन नुकसान झाले आहे. जनावरांचा चारा, गहू, ऊस ही पिके पाण्याअभावी खराब झाली आहेत. तसेच महावितरणचा मनमानी भोंगळ कारभार यामुळे शेतकर्‍यांची शेती, पशूधन अडचणीत आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हा डी.पी. सध्याच्या जागेवरून लोकवस्तीत स्थलांतरित करावा, म्हणजे तो चोरीस जाणार नाही.

दरम्यान, हा डी.पी. सध्या ६३ एच.पी. लोडचा असून तो १०० एच.पी.चा वाढवून मिळावा. कारण या डी.पी.वर सध्या १०० एच.पी.च्या वर लोड आहे. त्यामुळे डी.पी. जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके व पशूधन धोक्यात येऊन नुकसान झाल्यामुळे महावितरण कंपनीकडून शेतकर्‍यांना पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, या डी.पी.वरील शेतकर्‍यांची सहा महिन्यांची वीजबिले माफ करावीत, अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदारांकडे केलेल्या आहेत. यावर कार्यवाही न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल व याची संपूर्ण जबाबदारी महावितरण व शासनावर राहील, असे निवेदनात म्हटले आहे.


या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव,दादा जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.