साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथील श्री दत्त इंडिया या साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022/ 23 मध्ये उच्चांकी गाळप केले असून त्याची एफ आर पी प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा केले असण्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात द्वारे दिली आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की
श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा 4 थ्या गळीत हंगामामध्ये उच्चांकी 6 लाख 80 हजार टन ऊस गाळप करून शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी कारखाना बंद करण्यात आला या हंगामामध्ये गाळपास आलेल्या 6 लाख 80 हजार मेट्रिक टन उसाची प्रति टन 2 हजार 772 प्रमाणे एफ आर पी ची 188 कोटी 75 लाख 54 हजार रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असून या गळीत हंगामास ऊस पुरवठा करणारे सर्व शेतकरी बांधव ऊस वाहतूकदार ऊस तोडणीदार , कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम पूर्ण झाला असून पुढील गळीत हंगाम 23/24 साठी सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला सर्व ऊस श्री दत्त इंडिया कारखान्याकडे गळीतास घालावा असे आवाहन केले आहे गाळप हंगाम समाप्ती वेळी गव्हाण पूजन व मोळी पूजन झाले यावेळी कंपनीचे संचालक चेतन धारू, करण रुपारेल , व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे , मुख्य शेती अधिकारी सदानंद पाटील , सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी तोडणीदार , वाहतूकदार उपस्थित होते .