साखरवाडी(गणेश पवार)
कामावरून घरी जाण्यास निघालेल्या महिलेस गाडी आडवी मारून शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी पतीसह तीन जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभांगी बाळकृष्ण ढेंबरे (रा चौधरवाडी ता फलटण) या दिनांक 21 रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास काम उरकून फिर्यादी चौधरीवाडी येथे घरी निघाले असता जिंती नाका येथून 7.45 वाजण्याच्या सुमारास जात असताना त्यांच्या पाठीमागून एक चार चाकी पिवळ्या रंगाची नॅनो टाटा कंपनीची गाडी येत असल्याचे जाणवले. चौधरवाडी येथील बामणकीचा ओढा येथून जात असताना फिर्यादी यांना नॅनो चार चाकी गाडी चालवत असलेला फिर्यादी यांचा नवरा बाळकृष्ण भिमराव ढेंबरे (रा शिंदेवाडी ता फलटण जि सातारा) हा फिर्यादी यांना आवाज देत होता की तू गाडी थांबव परंतु फिर्यादी यांनी गाडी थांबवली नाही तशीच पुढे निघून गेल्या त्यानंतर चौधरीवाडीच्या कॉर्नरला एस टी स्टॅण्डजवळ रस्त्यात मला गाडी आडवी मारून फिर्यादी पळून जावू नये म्हणून गाडीची चावी काढून घेवून तू माझ्यासोबत गाडीत बस आणि माझ्यासोबत चल असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तेवढ्यात पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी आली व त्यातून दोन अनोळखी तृतीय पंथीय लोक उतरले व फिर्यादी यांना म्हणाले की तू आमच ऐक व तुझ्या नवऱ्यासोबत जा असे म्हणाले त्यातील एकाने फिर्यादी यांना गाडीत बसवण्यासाठी ढकलले व दुसऱ्याने फिर्यादी यांची गाडी धरली तेवढ्यात फिर्यादी यांच्या गावातील दोन मुले आले व त्यांनी भांडणे सोडवा सोडव कैली व त्यांनी फिर्यादी यांना घरी जाण्यास मला मदत केली. त्यानंतर तीन जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.