साखरवाडी गणेश पवार
सस्तेवाडी तालुका फलटण येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाली असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी, सस्तेवाडी येथील प्रिया नारायण आवटे (वय 19) ही युवती दिनांक 21 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून राहत्या घरातून कोणासही न सांगता बेपत्ता झाली असल्याची फिर्याद नातलगांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत