साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी ता. फलटण कारखाना बैलगाडी गेट समोर वडाचे झाडा खाली बेकायदा बिगर परवाना जुगार प्रकरणी तीन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास मौजे साखरवाडी ता. फलटण कारखाना बैलगाडी गेट समोर वडाचे झाडा खाली बेकायदा बिगर परवाना रणधिर मारुती कदम ( रा. सात सर्कल साखरवाडी ता. फलटण) हे स्वताचे आर्थिक फायद्या करीता लोकांचे कडून पैसे स्वीकारून कल्याण नावचा मटका जुगार त्यांचा मालक शाहुराज विठ्ठल जगताप व सागर देवीदास अहिवळे (रा. मंगळवार पेठ फलटण) यांच्या सांगण्यावरून चालवित असताना त्याचे कब्जात 1 हजार 290 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य असा माल मिळुन आला या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निखिल आत्माराम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.