साखरवाडी (गणेश पवार)
उपळवे ता फलटण येथील स्वराज साखर कारखान्याला ऊस तोडणी वाहतूक करण्यासाठी नोटरी करून वेळोवेळी एकूण 18 लाख रुपये घेऊन ऊस तोडण्यास न येता कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली असून गुन्ह्याची फिर्याद अनिल पांडुरंग तावरे रा उपळवे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वराज साखर कारखान्याला ऊस तोडणी व वाहतूक करण्या करिता संशयित आप्पा शिवाजी मसुगडे रा धर्मपुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, वैशाली सोमनाथ मदने, सोमनाथ दादाराम मदने दोघे रा झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी 7 मार्च रोजी नोटरी करून दि. 16 जून 22, 24 ऑगस्ट 22 व 29 सप्टेंबर 22 असे प्रत्येकी 6 लाख प्रमाणे एकूण 18 लाख रुपये घेऊन माझा विश्वास संपादित करून आमच्या कारखान्याने दिलेल्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून इतर कारखान्यास ऊस घालून आमच्या कारखान्याचे आर्थिक नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत करीत आहेत