अज्ञाता विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साखरवाडी(गणेश पवार)
साखर कारखान्यास ऊस वाहतूक करून कारखान्याच्या समोर लावलेला ट्रॅक्टर व दोन लहान दोन चाकी ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय सहदेव शिंदे, व्यवसाय ऊस तोड कामगार (रा ढेकनमोहा ता जि बीड) हे ऊस तोड करणेसाठी फलटण शहरात न्यू हॉलड कंपणीचा नं MH23BC8474 ट्रॅक्टर व दोन लहान दोन चाकी ट्रॉली श्रीराम कारखान्याला ऊस तोड व वाहतूक काम करत होते. दिनांक 19 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ कृष्णा याने श्रीराम कारखान्याला ऊसाचा अंदाजे 5 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर खाली करून ट्रॅक्टर व दोन चाकी ट्रॉली असे श्रीराम कारखान्याच्यासमोर लावून कारखान्याच्या कॅन्टींगमध्ये जेवण करणेस गेले व जेवण करून आल्यानंतर त्याने लावल्या ठिकाणी ट्रॅक्टर पाहिला असता त्याला ट्रॅक्टर दिसला नाही म्हणून त्याने आजूबाजूस श्रीराम कारखान्याच्या परिसरात ट्रॅक्टरचा शोध घेतला परंतु ट्रॅक्टर दिसून आला नाही. यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.