साखरवाडी (गणेश पवार)
मठाची वाडी (तालुका फलटण) येथे चोरट्यांनी एकाच रात्री 4 घरे फोडून 45 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केली असून गुन्ह्याची फिर्याद तुकाराम गणपत भांडवलकर रा मठाचीवाडी सध्या राहणार कोळकी ता फलटण यांनी दिली असून अज्ञातांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक 23 मार्च दुपारी 12 ते 24 मार्च पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मठाचीवाडी तालुका फलटण येथील फिर्यादी यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कटावणीच्या साह्याने उघडून स्वयंपाक घरातील लोखंडी कपाटातून चांदीच्या वस्तू चोरून नेल्या असल्याचे तसेच गावातील मोहन दिनकर जाधव यांच्या दुकानातून 300 रुपये, बजरंग पांडुरंग खाडे यांचे घरातून 25 हजार रुपये व किरण हनुमंत धुमाळ यांच्या घरातून 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर अरगडे करीत आहेत