साखरवाडी(गणेश पवार)
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील मठाचीवाडी, बरड, राजुरी, कुरवली परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दि 26 रोजी राजुरी गावातील प्रल्हाद शंकर पिसाळ यांच्या घरातून रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या पायजम्याच्या खिशातील 40,000 व सुटकेस मधील 1 लाख रुपयाची रोकड चोरून नेल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक 26 मार्च रोजी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरात झोपले असताना दोन अनोळखी इसमानीं त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या पायजम्याच्या खिशातून 40 हजार रुपये व आतल्या खोलीतील सुटकेस मधील 1 लाख रुपये असा एकूण 1लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पो ना काशीद करीत आहेत. मागील काही दिवसांपासून फलटण पूर्व भागातील मठाचीवाडी, बरड, राजुरी, कुरवली या गावांमध्ये चोरट्यानीं धुमाकूळ घातला असून वाढत्या चोऱ्यांच्या घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे