विडणी -(योगेश निकाळजे ) -विडणी ता.फलटण येथे शिवजयंतीनिमिताने विविध कार्यक्रमांसह भव्य शाही मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेड विडणी व माझेरी यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि.19 रोजी शिवजयंतीनिमित्ताने सायंकाळी ' 6 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिव व्याख्याते रवीकुमार ठावरे (सर) यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची गावातून भव्य शाही मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींचे आकर्षक सजावट केलेला डेकोरेशन सेटसह जिवंत देखावा ही ठेवण्यात आला आहे तसेच घोडे,महाराजांची पालखीही असून विशेष आकर्षण म्हणून डिजे प्रतिकचा छावा72+ ओव्हरटेक कॅबिनेट साऊंड व साई लाईट शो असल्याने या भव्य शाही मिरवणूकीमध्ये विडणी व पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहें.