साखरवाडी गणेश पवार
उपळवे तालुका फलटण गावाच्या हद्दीमध्ये तरडफ रस्त्यावरील माळ नावाच्या शिवारात फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पाच लाख 25 हजार रुपये किमतीची सुमारे 13 किलो गांजाची झाडे जप्त केली असून हिंदुराव दादू लंबाते वय 60 रा उपळवे ता फलटण व सागर हिंदूराव लंबाते वय 25 या दोघां पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून अधिक मिळालेल्या माहितीनुसार, उपळवे गावातील तरडफ रस्त्यालगत माळ नावाच्या शिवारात हिंदुराव दादू लंबाते यांच्या मालकीच्या गट नंबर 846 मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी दिनांक 12 रोजी या ठिकाणी छापा टाकला असता तीन ते आठ फूट उंचीची 13 किलो वजनाची गांजाची झाडे या ठिकाणी आढळून आल्याने या दोघांवरती गुन्हा दाखल झाला आहे.गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी दिली असून या कारवाईमध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक काशीद, जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, जगदाळे, नायक तहसीलदार एस एस सावंत मॅडम, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांचा सहभाग होता गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस ए धोंगडे करीत आहेत