Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोलमजुरी करून कला जोपासणारे सुरवडी गावचे सुपुत्र संजय जाधव यांची भूमिका असणारा 'वाघर' चित्रपट 14 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

 


साखरवाडी (गणेश पवार)

मोलमजुरी करून आपली कला जोपासत छोट्या-छोट्या वेबसिरीज व मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे सुरवडीचे  गावचे सुपुत्र संजय जाधव यांची महत्वाची भूमिका असणारा 'वाघर' हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी सर्व महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.




राजेंद्र महादेव बरकडे निर्मित व भिमराव पडळकर दिग्दर्शित, छोट्या कळीच्या भावविश्‍वाचे दर्शन घडवणारी ही एक आगळी वेेगळी कथा असलेला वाघर हा चित्रपट असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे, दिग्दर्शक भिमराव पडळकर, सिनेमॅटोग्राफर अमन खान व आदी उपस्थित होते.



ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता की एक 12 वर्षांची ठकी नावाची छोटी मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी आहे, पण अचानक तिच्या लग्नाची तयारी चालू होते आणि तिच्या आनंदाला जणू काही नजरचं लागते. तिला इच्छा नसतानाही लग्न करण्याची वेळ येते व अनेक प्रसंगांना तोंड देताना यामध्ये दिसून येत आहे. ट्रेलर पाहून हा चित्रपट वास्तविकतेचे दर्शन घडवणारे वाटत आहे, चित्रपटाची कथा भावनिक असून चित्रपटात समिक्षा सोनवलकर,  मिलिंद शिंदे,  संजय जाधव,  प्रिया दुबे यांच्यासह सहकलाकारांनी भूमिका निभावल्या असून चित्रपटातील बहुतांश कलाकार फलटण तालुक्यातील आहेत.‘राजेंद्र फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत वाघर चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले व दिग्दर्शन भिमराव पडळकर यांचे असून अनेक मराठी व हिंदी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर अमन खान यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. संगीताची बाजू रवि वव्हाळे आणि विकी हांडा यांनी पाहिली. चित्रपटाचा टिझर पाहून रसिक प्रेक्षकांना 14 ऑक्टोबर ची उत्सुकता लागून राहिली आहे, यात शंकाच नाही.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.