फलटणमध्ये बेकायदेशीर बांधकामाला नगरपालिकेचे अभय.....?? नगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाईची करण्याची अर्जदाराची मागणी..
साखरवाडीची वार्ताJuly 06, 2022
0
फलटण दि 7 जुलै
फलटण नगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार सजग नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व फलटण नगरपालिका यांच्याकडे केली असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की फलटण शहरातील लक्ष्मी नगर, येथील न भू क्रमांक 6472, प्लॉट नंबर 2 या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी खाजगी बिल्डिंगचे बांधकाम चालू आहे . सदर बांधकाम व्यावसायिकाने नगरपालिकेचे नवीन डीसीआर रुल याचे उल्लंघन करून रस्ता व बिल्डिंगचे सामासिक अंतर नियमाचा भंग करून सेटबॅक मध्ये ज्यादा बांधकाम केलेले आहे या बांधकामाबाबत फलटण मधील सतर्क नागरिकांनी फलटण नगरपालिकेकडे बांधकाम बेकायदेशीर असले बाबत व बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून बिल्डिंग काम चालू असले बाबत तक्रार फलटण नगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली आहे, व बेकादेशीर बांधकाम बाबत फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांच्या निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी सुद्धा या बांधकामाची जागेवर येऊन पाहणी केली त्यांची देखील बांधकाम बेकायदेशीर असल्याची जवळजवळ खात्री झालेली आहे . असे असताना देखील संबंधित बांधकाम व्यवसायाकडून नगरपालिकेशी आर्थिक संगणमत तर झाले नाही ना? त्यांनी या बिल्डिंगकडे व चालू असलेल्या बांधकामाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केलाआहे का? बिल्डिंग चे बांधकाम फलटण नगरपालिका प्रशासाक पाडणार का ? असा सवाल उपस्थित केला आहे.