जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
साखरवाडीची वार्ताJuly 11, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुक 2022 साठीच्या प्रारूप आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/ जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासहित) राखून ठेवण्याच्या जागा आणि उर्वरित जागा यासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला आहे त्यानुसार फलटण येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवना मागील नगरपरिषदच्या सभागृहात दि 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजत सभा आयोजित करण्यात आली असून दि 15 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होणार असून दिनांक 15 ते 21 जुलै दरम्यान जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदारांकडे नागरिकांना हरकती व सूचना मांडता येणार असल्याचे प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.