श्रीदत्त इंडिया येत्या हंगामात 10 लाख टन उसाचे गाळप करणार--जितेंद्र धारू 4 थ्या गळीत हंगाम रोलर पूजनाचा कार्यक्रम संजीवराजे यांच्या हस्ते संपन्न
साखरवाडीची वार्ताJune 25, 2022
0
साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखाना येणाऱ्या 2022/23 सालचा गळीत हंगामामध्ये 10 लाख टन उसाचे गाळप करणार असून कारखान्याचा विस्तार वाढीने तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक जितेंद्र धारू यांनी केले.कारखान्याच्या 4 थ्या मिल रोलर पूजनाप्रसंगी ते बोलत होते. मिल रोलर पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटणचे महंत विद्वंस शामसुंदर शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी राज्य सहकारी बँकेचे अविनाश महागावकर कंपनीच्या संचालिका प्रीती रुपारेल,चेतन धारू, प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप,जी एम सी टी साळवे,डिस्टलरीचे जी एम राहुल टिळेकर,चीफ इंजिनिअर अजित कदम ,शेतकी अधिकारी सदानंद पाटील, इंजिनिअर नितीन रणवरे,किशोर फडतरे,एच आर विराज जोशी, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर महानंदा दूध डेअरीचे उपाध्यक्ष डी के पवार, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय भोसले, सागर कांबळे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड, संतोष भोसले,पोपट भोसले,गोरख भोसले, संजय जाधव,महेश भोसले,आर बी भोसले यासह कारखान्यातील कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.