सृष्टी भोसले भविष्यात साखरवाडीचे नाव उज्ज्वल करेल -- दिलीप पवार(बाबा)
साखरवाडीची वार्ताJune 20, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
सृष्टी भोसले ही साखरवाडीची सुपुत्री साखरवाडीसह फलटण तालुक्याचे नाव भविष्यात निश्चित उज्ज्वल करेल असा विश्वास साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांनी व्यक्त केला. सृष्टी राजकुमार भोसले हिचा इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये साखरवाडी विद्यालय साखरवाडी या प्रशालेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आल्याबद्दल दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते तिचा शाल,हार व पेढे देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोना संकर्मनाच्या काळात इयत्ता दहावीचा निम्म्या वर्षाचा अभ्यास मुलांना ऑनलाइन पद्धतीने करावा लागला होता मात्र तरीसुद्धा जिद्द, कष्ट व कठोर परिश्रमाच्या जोरावर सृष्टीने दहावीच्या परीक्षेमध्ये उतुंग यश मिळवले ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असून भविष्यात सृष्टी भोसले ही उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदाची प्रशासकीय सेवा बजावून साखरवाडी सह फलटण तालुक्याचे नाव निश्चितच मोठे करेल असा विश्वास मला वाटतो. सृष्टी भोसले हिच्या यशाबद्दल तिचे साखरवाडीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक स्तरातील सर्वांकडून कौतुक होत आहे.