Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बी . जे इंग्लिश मिडियम स्कूलची सलग ७ वर्षे १०० % निकालाची परंपरा कायम ...

  


साखरवाडी गणेश पवार


खामगाव(नारळी बाग 5 सर्कल) ता फलटण येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या बी . जे इंग्लिश मिडियम स्कूच्या नुकताच जाहिर झालेल्या शालांत परिक्षेत इ १० च्या विदयार्थ्यानी १०० % निकालाची परंपरा अखंड ठेवली आहे . एकूण २७ विदयार्थ्यांपैकी २६ विदयार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून . शाळेतील प्रथम ३ क्रमांक मिळवणारे विदयार्थी अनुक्रमे कु . शिवराज वैभव जगताप (९ ७.२० %) , कु . प्रणव लक्ष्मण भोसले (९ ४.६० %) , तर कु . ज्ञानदा मोहन शिंदे (९ ४.२० %) एकूण ८ विदयार्थी टक्केवारी ९ ० % च्यापुढे आहे तर   १७ विदयार्थी ८० % च्या पुढे असून ०२ विदयार्थी ७० % च्या पुढे आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इ १० वीचा अभ्यासक्रम गत वर्षी  ऑनलाईन शिक्षणाने सुरू झाला होता  तरी सुद्धा मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदाच्या योग्य मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी चिकाटी व मेहनतीने अभ्यास सुरू ठेवून हे यश संपादन केले . सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे शाळेचे चेअरमन , संचालक , मुख्याध्यापिका सौ . रसिका जगताप व शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.