Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीच्या संत गाडगे बाबा दिंडीतील ट्रकला शिंदवणे घाटात अपघात.... सर्व वारकरी सुखरूप

 




साखरवाडी गणेश पवार


 साखरवाडी ता फलटण येथून पंढरपूरच्या वारीसाठी आळंदीला जाणाऱ्या संत गाडगे बाबा दिंडी सोहळ्याच्या ट्रकला (एम एच १२ डी टी ४३६२)  ब्रेक निकामी होऊन अपघात झाला असून यामध्ये  9 वारकरी किरकोळ जखमी झाले असून एकूण 60 वारकऱ्यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही  याबाबत दिंडी चालक राहुल सोनटक्के यांनी दिलेली माहिती अशी की, ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक डोंगर माथ्यावरील कड्यावर अडकून पडला त्यामुळे ट्रकच्या टपावर  बसलेल्या ९ व्यक्ती या वरुन  खाली पडल्याने जखमी झाले आहेत बाकी इतर कोणत्याही वारकऱ्यांना इजा पोहचली नाही हा ट्रक जेजुरी मार्गे शिंदवणे घाटातून चालला होता . या ट्रकने पहिले वळण घेतल्यानंतर दुसऱ्या वळणावर चालकाला ब्रेक निकामी झाले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रक चालकाने हा ट्रक घाटमाथ्यावर इतर पर्यायी जागेवर वळण्याचा प्रयत्न केला पण ट्रक नियंत्रणात न आल्याने ट्रक तसाच पुढे सरकत जाऊन पुढे असलेल्या वळणावर लटकून पडला . केवळ दैव बलत्तर म्हणून वळणावरील २५ फूट कड्यावर ट्रक लटकला . जखमींना  तातडीने उरुळी कांचन येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे . या अपघातात अनिल सोमनाथ ढेरे ( वय ५० ) , भागवत निवृत्ती शिंगारे ( ६० ) , महेश भगवान ( वय ६५ ) , यशवंत भोसले ( वय ७० ) , स्वामिनाथ गोरख पवार ( ६५ ) , संतोष गुलाब जगदाळे ( ४२ ) , जयश्री पवार , सावित्रीबाई गायकवाड , सुभाष कट्टी ( रा . सर्व साखरवाडी , ता.फलटण , जि . सातारा ) अशी जखमींची नावे आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.