Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडी ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेची मागणी .. मागील दोन सभेतील थकीत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांकडून निवेदन..

 



साखरवाडी गणेश पवार

साखरवाडी तालुका फलटण येथील ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रेखा जाधव यांच्याकडे  ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सुनंदा पवार हरीश गायकवाड व इतर ग्रामस्थांनी दिले असून दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, 24 एप्रिलची ग्रामसभा कोरम अभावी व 2 मे रोजीची ग्रामसभा आम्ही मांडलेल्या विषयांना बगल देऊन तुम्ही  पूर्ण केली त्यामुळे ते विषय अजेंड्यावर घेण्यासाठी ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा आपणाकडून आयोजित केली जावी व त्यामध्ये साखरवाडीच्या आरोग्यविषयक सोयीसुविधा व परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचावून ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठीच्या विषयांवर चर्चा व्हावी त्यामध्ये  साखरवाडीच्या वाढीव गावठानासाठी  शेती महामंडळाकडे जमिनीची मागणी करणे, 14 व्या वित्त आयोग अंतर्गत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत चौकशी करणे,15 व्या वित्त आयोगाच्या कामाबाबत आराखडा तयार करणे, लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेबाबत चर्चा करणे, श्रीदत्त इंडिया कारखान्याच्या विस्तारीकरण यांमध्ये आसवानी(डिस्टलरी) सहवीज(को जन) प्रकल्पास व श्रीदत्त इंडिया संचलित सुसज्ज हॉस्पिटल साठी ना हरकत दाखला प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा करण्यात यावी व ऐन वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली  आहे.यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, माजी सरपंच जयराम नाना भोसले, सुरेश भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र का भोसले,होळ सोसायटी चेअरमन निवृत्ती भोसले, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अरुण काका गायकवाड, समीर भोसले, मातोश्री कन्ट्रक्शन चे संजय भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष महेश भोसले,सुभाष भोसले, बापूराव भोसले, सुनील माने,बाळासो भोसले, जनार्दन भोसले, माऊली भोसले,भाऊसो भोसले,सचिन पवार, राजेंद्र भोसले, विराज भोसले, सचिन भोसले, युवराज रणवरे परिणय भगत, शहाजी भोसले,रमेश भोसले,गणपत धायगुडे, संग्राम पवार, आप्पा इंगळे, हेमंत भोसले व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.