प्रज्ञाशोध परीक्षेत साखरवाडीच्या सई मानेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
साखरवाडीची वार्ताMay 09, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ सुवर्णमहोत्सव सन 2022 आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत साखरवाडी येथील कु सई दिपक माने हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. साखरवाडी विद्यालय (प्राथमिक) विभागातील इयत्ता 4 थीची विद्यार्थिनी सई दिपक माने हिला प्रज्ञाशोध परीक्षेत 150 पैकी 138 गुण प्राप्त झाले असून तिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे तिला शिक्षिका दीप्ती भोसले, स्नेहल पवार यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचे शाळेचे मुख्याध्यापक संदीप चांगण व शाळेचे सर्व शिक्षक, साखरवाडीतील विविध स्थरातूनअभिनंदन होत आहे.