साखरवाडीच्या श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा तोडणी वाहतुक कराराचा शुभारंभ..
साखरवाडीची वार्ताMay 12, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा सन 2022/23 साठीचा ऊस वाहतूक कराराचा शुभारंभ कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात वाहतूक कंत्राटदार मोहन सोडमिसे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यावेळी कंपनीचे संचालक जितेंद्र धारु यांनी आगामी गळीत हंगामात 11 लाख मे.टन गळीताचे उदिदष्ट ठेवले असून त्या अनुशंगाने तोडणी वाहतूक करार सुरु केलेले असून तोडणी वाहतुकीची उचल लवकरच देणार असल्याचे सांगितले , तरी तोडणी वाहतुक कंत्राटदार यांनी आपल्या वाहनाचा करारा संदर्भात विभागीय गट ऑफिसकडे संपर्क करून करार पुर्ण करून घेण्याचे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप , मुख्य शेती अधिकारी सदानंद पाटील, ऊस पुरवठा अधिकारी दिगंबर माने, ऑफिस सुपरीटेडेट दिपक शिंदे, एच . आर. विराज जोशी यूनियन सेक्रेटरी राजेंद्र भोसले , पोपट भोसले , सुहास गायकवाड व बहुसंख्य वाहनमालक उपस्थितीत होते .