फलटण- लोणंद महामार्गावर जगतापवस्ती नजीक भीषण अपघात 2 जण जागीच ठार तर 11 जण जखमी
साखरवाडीची वार्ताMay 03, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
फलटण -लोणंद रोडवर मौजे सुरवडी येथे जगताप वस्ती नजीक इंडिका कार न MH 14 FC 1104 व तवेरा गाडी न MH 14 BA 5053 गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघेजण जागीच ठार तर इतर 11 जण जखमी झाले असून जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार, गुलबर्गा कर्नाटक येथून पुण्याकडे निघालेल्या तवेरा गाडीचा व पुण्याहून फलटणकडे निघालेल्या इंडिका कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला यामध्ये इंडिका कार मधील गोट्या उर्फ सचिन भारत काळेल वय 30 रा वळई ता माण जि सातारा,शुभम केवटे वय 28 रा संगमनेर ता अहमदनगर हे जागीच ठार झाले तर दैवत शामराव काळेल वय 37 रा वळई ता माण जि सातारा हे गंभीर जखमी झाले असून तवेरा गाडीमधील मलिकार्जुन विरलप्पा शिरगुंडे वय 63 त्यांची पत्नी सुवर्णा मलिकार्जुन शिरगुंडे (वय 55) रा देवरवस्ती मायनगर गुलबर्गा कर्नाटक,गंगाधर गुंडप्पा बेळसंगी त्यांची पत्नी पौर्णिमा गंगाधर बेळसंगी व त्यांची दोन मुल रचित व रचना सर्व रा देवरवस्ती मायनगर गुलबर्गा कर्नाटक,पूजा अरुण कुमार पाटील(वय 29)त्यांची दोन मुलं अ अद्विक व प्रणग्या (वय 8) रा नंदनवन सोसायटी हिंजवडी पुणे यांचा समावेश असून त्यांच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या लोणंद पोलीस स्थानकाचे स पो नि विशाल वायकरपो निरीक्षक गणेश माने यांनी दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.