साखरवाडी येथे भव्य दिव्य रोमहर्षक मिरवणुकीने शिव जयंती सोहळा संपन्न..
साखरवाडीची वार्ताMay 02, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरे प्रमाणे वैशाख शुद्ध द्वितीयेला फलटण शहराबरोबर संपूर्ण तालुक्यात मोठया उत्साहात साजरी केली जाते मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली होती मात्र यावर्षी कोरोना निर्बंध उठवल्याने भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार आज दि 2 मे रोजी साखरवाडी ता फलटण येथे अतिशय भव्य दिव्य मिरवणुकीने शिवजयंती साजरी करण्यात आली पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांसह ढोल ताशे, हलगी व डीजे च्या तालात फटाक्यांच्या आतीषबाजीत 'जय भवानी जय शिवाजी' च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष व फलटण तालुका शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे साहेब, मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी मोठ्या क्रेनच्या साह्याने पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी साखरवाडी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन हंगे, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सर्व कार्यकर्ते व साखरवाडी पंचक्रोशीतील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.