Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडी ग्रामसभेत प्रचंड खडाजंगी ग्रामसभा अध्यक्षा सभेतून उठून गेल्याने राजे गटाकडून जाहीर निषेध..

 


साखरवाडी गणेश पवार

 साखरवाडी ता फलटण ग्रामपंचायतमध्ये  आज आयोजित केलेल्या  ग्रामसभेमध्ये राष्ट्रवादी राजे गट व सत्ताधारी विधायक विकास आघाडी मध्ये प्रचंड खडाजंगी झाली.अवेळी आलेले विषय सभेमध्ये घेणार नसल्याचे सांगून ग्रामसभेच्या अध्यक्षा व  विद्यमान सरपंच रेखा संजय जाधव यांनी ग्रामसभेतून निघून गेल्याने राष्ट्रवादी राजेगट व ग्रामस्थांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर  अध्यक्ष व सरपंच यांचा जाहीर निषेध केला यावेळी बोलताना  माजी सरपंच जयराम (नाना) भोसले यांनी म्हटले की, मागील दिनांक 24 एप्रिलची कोरम अभावीची तहकूब ग्रामसभा आज   शिवजयंतीदिनी आयोजित करण्यात आली होती  मागील अजेंड्यावरील विषय वाचून झाल्यानंतर परिसराच्या सामाजिक,आरोग्य व विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणाऱ्या श्रीदत्त इंडिया या साखर कारखान्याच्या जाणूनबुजून अडवून ठेवलेल्या ना हरकत प्रमाणपत्र व नोंदी बाबत चर्चा करावयाची असताना एका विशिष्ट व्यक्तीच्या आदेशाने ग्रामसभेचे अध्यक्ष कोणालाही न सांगता बाहेर निघून गेले याचा आम्ही सर्व साखरवाडी ग्रामस्थ व राजे गट यांच्याकडून जाहीर निषेध करतो.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर महानंदा दूध डेअरीचे व्हाईस चेअरमन डी के पवार, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र  भोसले, समीर भोसले, दिलीप पवार, राजाभाऊ भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले,संजय भोसले, आर बी भोसले,चंद्रकांत भोसले,अभयसिंह निंबाळकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश भोसले, पोपट भोसले, युवराज रणवरे, केके भोसले, विराज भोसले, सूनील माने,ओंकार भोसले, सतिश भोसले (वारकरी) सूरज जाधव, हेमंत भोसले उपस्थित होते.

  यावेळी साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम सिंह भोसले यांनी म्हटले की, सभेतील अजेंड्यावरील विशेष संपल्यानंतर अवेळी आलेले विषय घ्यायचे की नाही याचा सर्वस्वी अधिकार ग्रामसभा अध्यक्षांना असल्याने अवेळी आलेले विषय न घेता ग्रामसभा संपली असे त्यांनी जाहीर केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.