सुरवडी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
साखरवाडीची वार्ताMay 14, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या अत्यंत निष्ठेने, निर्भीडपणे आणि तळमळीने संवर्धन व रक्षणाचे महान कार्य करणाऱ्या स्वराज्यरक्षक, महापराक्रमी,महाबुद्धिवान धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती सुरवडी ता फलटण येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने दिनांक 15 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज ग्रुप सुरवडी यांच्यावतीने करण्यात आले असून रक्तदान रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5:00 जि.प.शाळा सुरवडी याठिकाणी होणार असून यावेळी प्रत्येक रक्तदात्यांस प्रोत्साहन पर छत्रपतींची मुर्ती भेट मिळणार आहे.