Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण शहर पोलीसांची भेसळयुक्त बेकायदेशीर ३४ बॅरलची वाहतुकीवर कारवाई 35 लाखाचा मुद्देमाल जप्त

 


साखरवाडी (गणेश पवार)

 फलटण शहर पोलिसांनी भेसळयुक्त बेकायदेशीर डांबराची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे फलटण शहर पोलीस स्थानकातून आलेले अधिक माहितीनुसार, फलटण शहर पोलिसांना नाकेबंदीत बारामती पूल येथे दि १३रोजी सायंकाळी 6 वाजन्याच्या सुमारास  लोणंद बाजुकडुन फलटणच्या दिशेने येणाऱ्या  अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 25 यु 8292 हा बॅरलमध्ये भेसळयुक्त डांबर व भेसळयुक्त ऑईलची वाहतुक करीत असताना संशयास्पद मिळुन आला व त्यावरील ड्रायव्हर लहु बब्रुवान माने रा . चंडकाळ ता . उमरगा जि . उस्मानाबाद याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा माल हा सचिन कुन्हाडे व इतर अनोळखी दोन यांचे सांगणेवरुन शिरवळ येथील राजस्थानी ढाब्याचे पाठीमागे भरलेला असुन हैद्राबाद येथे घेऊन निघालो आहे असे सांगीतले . त्यावेळी मालाचे इन्व्हाईस पाहता सदरचा माल दिल्ली येथुन भरुन हैद्राबाद येथे खाली करण्यास निघाला असलेचे नमुद असल्याने बिलाबाबत संशय आल्याने ड्रायव्हर लहू माने याचेकडे विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला सदरबाबत संशास्पद वाटत असल्याने सदरचा ट्रक फलटण शहर पोलीस स्टेशन आवारात आणुन लावण्यात आला आहे. एकुण ५२ बॅरल हे भेसळयुक्त डांबराचे मिळुन आले ज्याबाबत ड्रायव्हर लहू माने यांचेकडे कोणतेही बिल नव्हते . तसेच एकुण ३४ बॅरल हे बेकायदेशिर भेसळयुक्त ऑईलचे बॅरल मिळुन आलेने त्याचा सविस्तर पंचनामा करुन डांबराचे ५२ बॅरल , बेकायदेशिर भेसळयुक्त आईलचे ३४ चॅरल व माल ट्रक असा एकुण ३५ , ५०,००० / - रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.सदर गुन्ह्याचा तपास श्री नितीन शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत असून सदर कारवाई भारत किंद्रे पोलीस निरीक्षक , श्री नितीन शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरज शिंदे पोलीस उपनिरीक्षक , पोहवा सुरेश शिंदे , पोहवा महादेव पिसे , पोना शरद तांबे , पोना नितीन भोसले , पोकॉ . अतुल बड़े , पोकॉ . पांडुरंग धायगुडे , पोकॉ . गणेश ठोंबरे , पोकॉ , सहदेव साबळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.