सरडे व खटकेवस्ती येथील अवैध दारू विक्रीवर फलटण ग्रामीण पोलीसांचा छापा
साखरवाडीची वार्ताMay 13, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
फलटण तालुक्यातील सरडे व खटकेवस्ती येथे अवैध ताडी व दारू विक्रीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून दोघांवर महाराष्ट्र दारू बंदी अधिनिय कलामांतर्गत गुन्हा दाखल केला असून फलटण ग्रामीण स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, सरडे येथील मलकय्या यमनच्या गुत्तेदार हा त्याचे राहत्या घराच्या पाठीमागील बाजुस घराच्या आडोशाला बेकायदा बिगर परवाना ताडीची चोरटी विक्री करीत आहे.तसेच मौजे खटकेवस्ती ता . फलटण येथे इसम प्रफुल ऊर्फ पप्पु दिलीप मदने हा त्याचे राहत्या घराच्या पाठीमागे देशी दारूची चोरटी विक्री करीत आहेत त्यानुसार सहा.पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी दोन पंचाना बोलावून घेवून सदर ठिकाणी छापा टाकून दोघांच्या विरोधात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे . सदरची कामगिरी ही धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे सहा पोलीस निरीक्षक , सहा . पोलीस फौजदार सुर्यवंशी , पो.हवा . साबळे , पो.हवा . कर्णे , चालक पो . हवा . यादव व पो.कॉ. अवघडे यांनी केली .