सुरवडी गावची भैरवनाथ यात्रा यावर्षी भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार--प्रल्हादराव साळुंखे-पाटील
साखरवाडीची वार्ताApril 27, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
सुरवडी तालुका फलटण येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा यावर्षी अतिशय भव्य स्वरूपात साजरी होणार असून मागील दोन वर्षापासून कोरोना रोगाच्या संक्रमनामुळे अतिशय साध्या व मोजक्या लोकांच्यात यात्रा साजरी करावी लागली होती मात्र यावर्षी कोरना संक्रमणाचे सर्व निर्बंध शासनाकडून उठवले असल्याने सुरवडी गावची भैरवनाथाची यात्रा अतिशय भव्य दिव्य स्वरुपात विविध कार्यक्रमांनी साजरी करणार असल्याचे फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सुरवडी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा दि 22 एप्रिल पासून सुरू झाली असून उद्या दि 28 रोजी श्रींचा छबीना रात्री 10 ते पहाटे 3 या वेळेत होणार असून शुक्रवार दिनांक 29 रोजी 'भिका भिमा सांगवीकर' यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला असून सायंकाळी 5 वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान जिल्हा परिषद शाळा सुरवडी याठिकाणी होणार असून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील नामांकित मल्लांच्या जंगी कुस्त्यां यावेळी होणार आहेत दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी 'शिवानीचा नादच खुळा' हा लोकप्रिय लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रविवार दिनांक 1 मे रोजी 'अहो नादच खुळा' हा अप्रतीम लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आयोजक समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे.