काळज ता फलटण येथे क्रुझर गाडी पलटी होऊन नवविवाहित नवरदेव ठार...
साखरवाडीची वार्ताMay 22, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
काळज तालुका फलटण येथे क्रुझर गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात बार्शी ता बार्शी जिल्हा सोलापूर येथील सुखदेव रवींद्र वाघमोडे (वय26) या नवविवाहित नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहितीनुसार बार्शी जिल्हा सोलापूर येथील नवविवाहित सुखदेव रवींद्र वाघमोडे व त्यांचे कुटुंबीय हे जेजुरी या ठिकाणी देव दर्शनासाठी गेले होते तेथील देवदर्शन आटोपून धुळदेव तालुका फलटण येथे धुळोबाच्या दर्शनासाठी जात असताना काळज या ठिकाणी गाडी आल्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली या अपघातात नवरदेव सुखदेव हे गंभीर जखमी झाले होते त्यांना पुढील उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणजोत मालवली.