Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीकरांच्या प्रेमाने भारावून गेलो - श्रीमंत ना. रामराजे नाईक निंबाळकर

 


साखरवाडी गणेश पवार

साखरवाडी करांच्या प्रेमाने  भारावून गेलो असून फलटण शहरानंतर पहिल्यांदाच ग्रामीण भागात  माझा वाढदिवस एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा होत असून त्यानिमित्ताने वृक्षारोपण व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप या विधायक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आयोजकांचे मनापासून आभार आज जागतिक तापमान वाढ रोखण्याचे काम फक्त वृक्ष लागवडी मधूनच शक्य असल्याने आपल्याला भविष्यात प्रति व्यक्ती मागे किमान 14 झाडे लावणे गरजेचे आहे. साखरवाडी हे वैचारिक क्रांतीचे गावअसून सर्वांनी मनावर घेतल्यास ही गोष्ट अवघड नसल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना रामराजे नाईक निंबाळकर यांनी साखरवाडी, होळ, जिंती, खामगाव, फरतरवाडी ग्रामस्थांनमार्फत  डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम  शाळेत आयोजित वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभात केले. यावेळी या कार्यक्रमाला फलटण कोरेगावचे आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सभापती शंकरराव माडकर, महानंदा चे व्हाईस चेअरमन डी के पवार, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, अभयसिंह निंबाळकर,  श्रीराम कारखान्याचे संचालक शरदराव रणवरे , पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा ताई भोसले,रवींद्र टिळेकर(सर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना ना. रामराजे पुढे म्हणाले, मागील 30 वर्षापासून फलटणकर जनतेच्या आशीर्वादाने आम्हा नाईक-निंबाळकर कुटुंबियांना भरभरून प्रेम दिले असून त्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर राज्यात सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मला मिळाली असून सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. पूर्वीपासून दुष्काळी तालुका अशी ओळख असलेला तालुक्याचा दुष्काळी भाग  धोम-बलकवडीचे पाणी आल्याने बागायती झाला असून येणाऱ्या काळात नीरा देवधर चे पाणी फलटण तालुक्यात येणार असल्याने तालुका अधिक सुजलाम-सुफलाम होणार असून आपल्या सर्वांच्या हक्काचे दोन कारखाने अतिशय जोमाने सुरू असल्याने व पुढील वर्षी दोन्ही कारखाने किमान 7 ते 8 हजार प्रतिदिन क्षमतेने चालणार असल्याने यावर्षी प्रमाणेच अतिरिक्त उसाचा प्रश्न आपल्याला भविष्यात सुद्धा भेडसावणार नाही तसेच ज्या प्रमाणे कारखाने व उद्योगधंदे या परिसरात वाढत आहेत  रोजगार वाढत आहेत ते पाहता  भविष्यात साखरवाडी, जिंती, तरडगाव या गावांचा शहरीकरण येत्या पाच दहा वर्षात निश्चित होईल अशी मला खात्री आहे. शालेय विद्यार्थ्यांना फक्त गणवेश वाटपावर न थांबता सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्यांच्या उच्च शिक्षणासाठी व त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपणा सर्वांनाच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सुद्धा ना. रामराजे यांनी  वेळेस मांडले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ना. शरद पवार साहेब यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली व  राजकारणात वाढत चाललेली वै रस्य हे येणाऱ्या काळात अतिशय धोकादायक असल्याने त्यांनी  यावेळी नमूद करून वेळप्रसंगी फलटण बंदची हाक देणार असल्याचे त्यांनी यावेळेस म्हटले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर बी भोसले यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी सदस्य सागर कांबळे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड,  पै संतोष भोसले,पोपट भोसले, गोरख भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश भोसले, मातोश्री कन्ट्रक्शनचे संजय भोसले,  ग्रामपंचायत सदस्य हरीश गायकवाड, दत्तात्रेय वाघ, मच्छिंद्र भोसले, सचिन भोसले,नितीन जगताप,प्रदीप जाडकर,सचिन फडतरे,कल्याण काटे,अनुराग नलवडे,विजय बापू फडतरे,शरद रणवरे,रावसाहेब वैद्य,हिरामण चाबुकस्वार, विक्रम घाटगे व बहुसंख्येने राष्ट्रवादी राजे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अमोल भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.