राजुरी येथील दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल...
साखरवाडीची वार्ताApril 07, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
फलटण तालुक्यातील खासगी सावकारांविरोधात तक्रार देण्याचे सत्र सुरूच असून राजुरी ता फलटण येथे अजून एक बेकायदेशीर खासगी सावकारीच प्रकरण समोर आले आहे. त्यानुसार दोघा जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राजुरी गावातील दोघांविरोधात गावातीलच गणेश शंकर काळे(वय27) यांनी फिर्याद दिली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी गावातील गणेश काळे व त्यांचे मयत चुलते ईश्वर काळे दोघांनी सन जानेवारी 2020 साली गावातीलच गणेश बाळासो खुरंगे व डॉ मधुकर गुलाबराव माळवे यांच्याकडून दरमहा 10 टक्के व्याजदराने बेकायदेशीर एक लाख रुपये घेतले होते त्याबदल्यात दीड वर्षात वेळोवेळी व्याजाचे 280000/-(दोन लाख ऐंशी हजार) दिले होते तरीसुद्धा गणेश खुरंगे व त्याचा नातेवाईक डॉक्टर मधुकर माळवे यांनी मला वारंवार माझ्या सलुनच्या दुकानांमध्ये घेऊन शिवीगाळ व दमदाटी करून 'व्याजापोटी अजून दोन लाख रुपये दे' अन्यथा 'तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही' तसेच 'तुला पैसे द्यायचे जमत नसेल तर तुझी चार गुंठे जमीन आमच्या नावावर करून दे' असे म्हणून वारंवार मला धमकावीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत