बाळासाहेब रावसाहेब भोईटे यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने सुरवडीसह परिसरात हळहळ..
साखरवाडीची वार्ताApril 22, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
सुरवडी ता फलटण येथील श्री बाळासाहेब रावसाहेब भोईटे(मामा) वय59 यांचे आज दि 22 रोजी लोणंद-सातारा रस्त्यावर आदर्की फाटा येथे आकस्मिक अपघाती निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार असुन श्रीदत्त इंडिया प्रा लि कारखाना केन सप्लाय विभागात ते शेती मदतनीस म्हणून कार्यरत होते. सुरवडीसह परिसरात बाळू मामा या नावाने ते परिचित होते तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादरावजी साळुंखे -पाटील(तात्या) यांचे ते आत्ते भाऊ होत. त्यांच्या आकस्मित निधनाने सुरवडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.