जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न..
साखरवाडीची वार्ताApril 19, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
पिंपळवाडी ता फलटण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पंचायत समिती फलटणच्या गट शिक्षण विभागामार्फत (स्टार्स प्रकल्प)आयोजित शाळा पूर्व तयारी मेळावा नुकताच संपन्न झाला यामध्ये नाव नोंदणी, शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक आणि भावनिक विकास,भाषा विकास, गणनपूर्व तयारी, मार्गदर्शन/ समुपदेशन या विषयांना अनुसरून विकास पत्र भरण्यात आली यावेळी प्रा.मीनाक्षी गजानन नवले यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.यानंतर मुलांचे जनजागरण करून प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी ग्राहक पंचायतचे सचिव सोमनाथ मागाडे परिसरातील पालक शाळा समिती अध्यक्ष व सदस्य,कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भोजने व सौ- खोमणे यांनी केले.