Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सदगुरु योगीराज गुणानाथ साधू महाराजांच्या २०२व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त पिंपळवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


साखरवाडी(गणेश पवार)

साखरवाडी- पिंपळवाडी येथे दि . १३/०४/२०२२ ते १ ९ / ०४ / २०२२ पर्यंत सदगुरू योगिराज गुणानाथ साधु महाराज यांच्या २०२ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून पिंपळवाडीतील विठ्ठल रुखुमाई मंदिरात पहाटे ४ ते ६ काकड आरती  सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम , सकाळी ७ ते ८ प्रार्थना, स. ८ ते ११ व दु . ३ ते ५ ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन , सायं . ५ ते ६ हरिपाठ , सायं . ६ त ७ प्रवचन , रात्री ९ ते ११ किर्तन , रात्री ११ नंतर हरिजागर याचा लाभ हजोरो भाविक घेत आहेत . चैत्र वद्य ३ मंगळवार दि .१ ९ / ०४ / २०२२ रोजी योगिराज गुणानाथ साधु महाराज यांच्या संजिवन समाधीस २०२ वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा व ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखीतुन मिरवणूक काढून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी व किर्तन सेवा ह . भ . प . नंदकुमार महाराज कुमठेकर यांची होईल याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट पिंपळवाडी , श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ पिंपळवाडी चे ह.भ.प. श्री प्रकाश पवार महाराज यांनी केले आहे . तसेच सदगुरू योगिराज गुणानाथ साधु महाराज यांच्या चरित्र पुस्तकाचे लेखन कार्य सुरू असून यांच्या बाबत काही माहिती असेल तर भाविकांनी श्री रविंद्र वेदपाठक ( पिंपळवाडी ) , श्री सचिन चव्हाण ( पिंपळवाडी ) , मो.नं. ९९ ७०७४ ९ १७७ , ८८४७७५८४७७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.