माडकरवस्ती (जिंती) येथे विविध उपक्रमांनी हनुमान जयंती साजरी...
साखरवाडीची वार्ताApril 17, 2022
0
साखरवाडी (गणेश पवार)
माडकर वस्ती (जिंती) ता फलटण येथे जय हनुमान तरुण मंडळाने यावर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांचा कोव्हिडं योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्याचबरोबर 'माझे माहेर माडकर वस्ती' या उपक्रमांतर्गत माहेरवाशिन महिलांचा सन्मान मंडळातर्फे करण्यात आला या वेळी सदर सन्मानाने माहेरवाशीन महिला भारावून गेल्या.येथील मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त सकाळी 5 वाजल्यापासून भजन व सकाळी 6 वाजता हनुमान जन्म सोहळा पार पडला सायंकाळी साडेपाच वाजता मुस्लिम कीर्तनकार ह.भ.प. कबीर महाराज(झी टीव्ही फेम) यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी परिसरातील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते आठ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.जयंती उत्सवास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सभापती शंकरराव माडकर, महानंदा डेअरीचे व्हा.चेअरमन डी. के.पवार, श्रीराम चे संचालक शरद विश्वासराव रणवरे, ग्रामपंचायत फडतरवाडीचे उपसरपंच अनुराज नलवडे, पंचायत समिती माजी सदस्य सागर कांबळे,माजी सरपंच शरद रणवरे(सर), चंद्रकांत रणवरे, दत्तात्रय रुपनवर, नवलभैया रणवरे, विश्वजीत चंद्रकांत रणवरे, रणजित रणवरे, योगेश माडकर, सागर माडकर, नानासाहेब माडकर, सचिन माडकर, संतोष माडकर, राजेंद्र इमडे, धनाजी माडकर, सुदाम माडकर, रवी माडकर गणेश माडकर व जय हनुमान तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते